नाशिकसाठी लशींचा मुबलक पुरवठा हवा- अनिल भालेराव यांचे ना.भारती पवारांना साकडे

0

नाशिक- गेल्या काही दिवसांपासून नाशकात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत असल्याने रांगेत तासंतास उभे राहूनही काही नागरिकांना रिकाम्या हाते परतावे लागत असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाशिकला लशींचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी भाजपा महानगर मा.उपाध्यक्ष अनिल भालेराव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्याकडे दिल्लीत प्रत्यक्ष भेटीच्या वेळी केली. लशींच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून नाशकातील बरीच लसीकरण केंद्रे आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवसच सुरू होती. त्यामुळे तेथे पहाटेपासूनच रांगा लागल्याचे चित्र होते.प्रत्येक केंद्रांवर फक्त 100 डोस उपलब्ध पुरविले जात होते त्यामुळे रांगेत दीर्घकाळ उभे राहिल्यानंतरही लस न घेताच रिकाम्या हातानेच घरी परत जाण्याची वेळ येत असल्याने असल्याने लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला मोठयप्रमाणात सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी आणि केंद्रावर येणाऱ्या सर्वांनाच लस उपलब्ध व्हावी यासाठी नाशिकसाठी लशींचा मुबलक पुरवठा करण्यासाठी पावले उचलावीत,असे साकडेही अनिल भालेराव यांनी डॉ.भारती पवार यांना घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here