चिपळुण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने “गौरवपत्र “देऊन सन्मान

0

मुंबई : चिपळुणकरांच्या लक्षात राहील असा दीवस,२६जुलै २००५पेक्षाही प्रचंड पाऊस,अशा दाणादाण उडवलेल्या पावसातील एक थरारक घटना समोर आली ती म्हणजे संपुर्ण चिपळुण एस.टी स्टॅन्ड पाण्याखाली गेल.पण याच पावसाच्या पाण्यात तब्बल ९तास एस.टी.च्या टपावर बसुन डेपो प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी डेपोची९लाख रुपये रोकड वाचवली. तब्बल ९लाख रुपये घेऊन डेपो मॅनेजर आणि त्यांचे सात सहकारी उभ्या पावसात नाही,तर उभ्या आडव्या झोडपणा-या पावसात ९तास एस.टी च्या टपावर बसले होते.भयाण शांतता वरुन कोसळणारा पाऊस समोर अजुन पाण्याची पातळी वाढली तर मृत्यु अटळ, अशा परिस्थितीत राजेशिर्के आपल्या सहका-यांना एक टीम प्रमुख म्हणुन धीरोदात्तपणे सामोरे गेले. व ९लाखांची रोकड वाचवली. रणजित राजेशिर्के व त्यांच्या सहका-यांच कौतुक व अभिनंदन. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम म्हणुन जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ व शिक्षक मित्र सामाजिक संस्थेचे सचिव श्री.अरविंद भंडारी यांच्या हस्ते “गौरवपत्र “देऊन डेपो मॅनेजर रणजित राजेशिर्के यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समितीचे संतोष भंडारी, अनिकेत भंडारी, परेश तिरपणकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here