श्री. मुर्डेश्वर संस्थांनच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटी रुपये निधी मिळवून देणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) दि.29 नैसर्गिक, आध्यात्मिक आणि पर्यटन दृष्ट्या वैभव लाभलेल्या श्री. मुर्डेश्वर संस्थांनच्या परिसरात सुसज्ज भक्तनिवास, सभागृह, रस्ते, सिंचन, वृक्ष लागवड व संवर्धन , सुशोभीकरण अशा प्रकारचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्थानिक व शासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सविस्तर आराखडा तयार करा यासाठी खासबाब म्हणून 5 कोटी रुपयांचा निधी मिळवून देवू अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्री. मुर्डेश्वर संस्थान भेटी दरम्यान दिली.शुक्रवार ( दि. 23 ) रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्री. मुर्डेश्वर देवस्थानला भेट दिली. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी श्री. मुर्डेश्वर देवस्थान चे पिठाधिश ह.भ.प. ओंकारगिरी महाराज, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, डॉ. संजय जामकर, कृष्णा लहाने, बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, नॅशनल सूत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे , ह.भ.प. कमलाकर पिंगाळकर यांच्यासह बद्रीनाथ कोठाळे, शेषराव पा. जाधव, सर्जेराव पवार, माजी पं. स.सदस्य रोहिदास पवार, अंकुश गरुड आदिंची उपस्थिती होती.पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपूर्वी या भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था होती. त्यानंतर या भागातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. स्व. काशीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मुर्डेश्वर मंदिर परिसरात रस्ते, सभामंडप, सामाजिक सभागृह आदी विकास कामे करण्यात आली. असे असले तरी श्री. मुर्डेश्वर संस्थानला दर्जा वाढ देवून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने येथे सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.कोरोनाचे संकट नसते तर येथील विकास कामांना चालना मिळाली असती असे स्पष्ट करीत यावर्षी श्री. सिद्धेश्वर संस्थान ला पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पुढील बजेट मध्ये श्री. मुर्डेश्वर संस्थानला निधी देण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असेल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here