व्यापारी महासंघातर्फे आमदार सुहास अण्णा कांदे यांना व्यापाऱ्यांच्या लसीकरणाबाबत निवेदन

0

मनमाड – मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फे करोना काळात सर्वात पुढे राहून समाजाला सेवा देणाऱ्या व्यापारी वर्गाला फ्रन्टलाइन वर्करच्या श्रेणीत धरून त्यांचे लवकरात लवकर लसीकरण एका वेगळ्या केंद्रावर करावे असे आशयाचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुहास अण्णा कांदे यांना देण्यात आले. मनमाडमधील पेशंटची संख्या कमी झाल्यामुळे शनिवारचे लॉक डाऊन कमी करण्यात यावा अशी विनंती व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली. तसेच मनमाडकरांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या करंजवन योजना मंजूर झाली त्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा व्यापारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. मनमाडला एम आय डी सी सुरू करून मनमाड येथील व्यापार वाढेल असेही साकडे घालण्यात आले.याप्रसंगी मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक ,उपाध्यक्ष सुरेश लोढा,कुलदिपसिंग चोटमुरादी,मनोज जंगम , सचिव राजकमल पांडे,रईस फारुकी, गुरुदीपसिंह कांत, जुझर भारमल,मनोज आचेलीया, निलेश व्यवहारे,शामकांत शिरोडे,दिपुशेठ चावला,कॅटचे प्रतिनिधी कल्पेश बेदमुथा, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here