विशेष समुदाय आधारीत कार्यक्रम

0

मनमाड  -बालविकास सेवा योजना प्रक्रल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत मनमाड/येवला आंगणवाडी केंद्रा मधें विशेष समुदाय आधारीत कार्यक्रमाचे ज्या आंगणवाडी केंद्रात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित मुले आहेत त्याच आंगणवाडीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, बालकांची श्रेणी सुधारण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन कुपोषित बालकांच्या पालकानां मार्गदर्शन करण्यात आले,त्याच बरोबर त्यांना अमायलेज युक्त पीठ पाककृती कशी करतात हे दाखवण्यात आले व त्याचे पदार्थ बनवुन प्रत्याक्षीक दाखवण्यात आले.पालकवर्ग यांना मुलांच्या रोजची दैनदिनी बनवण्यासाठी त्यांना वह्याचे वाटप करण्यात आले,तसेच मुलांचे वजनही ह्या वेळी घेण्यात आले.कार्यक्रम घेण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी मा. फडोळ सर, मुख्यसेविका श्रीमती खरे मॅडम ,श्रीमती सोनवणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.ह्या कार्यक्रमासाठी सर्व आंगणवाडी सेविका /मदतनीस ताई आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात कामकाज केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here