शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने शिवसेना 55 वा वर्धापनदिन साजरा

0

मनमाड : शिवसेना मनमाड शहर शाखे तर्फे शिवसेना 55 वा वर्धापनदिन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री मा.श्री. मा उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने साध्यापद्धतीने मा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आले,शिवसेना वर्धापनदिनाचे कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी आमदार राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ शिवसैनिक हरीश आसर, सोनारकाका, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आले त्यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उध्दवसाहब आगे बडो हम तुमहारे साथ है, आवाज कोणाचा शिवसेनेचा असे जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे देऊन तोंड गोड करून शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी भाषण करताना सांगितले की” शिवसेना “आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला “संस्कार” विचार ,आचार आहे आज जो काहि मान सन्मान, सामाजिक राजकिय ओळख , प्रतिष्ठा मिळतेयं ती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेचं..! शिवसेना वाढीसाठी खर्ची करणाऱ्या सर्व मान्यवर जेष्ठ,निष्ठावंत, कडवट शिवसैनिकांनी आपलं आयुष्य बलिदान व अर्पण केलं आदींना मानाचा मुजरा व शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेची पूजा उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा समनव्यक सुनील पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले व गरजूंना शिवभोजन देण्यात आले वरील सर्व कार्यक्रमांना तालुका संघटक संजय कटारिया, राजाभाऊ कासार, विधानसभा संघटक संतोष जगताप, उपतालुकाप्रमुख दिनेश केकान, सुभाष माळवतकर, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, राजाभाऊ आहेर, नगरसेवक कैलास गवळी, विनय आहेर, लियाकत शेख, गालिब शेख, दिलीप तेजवाणी, हर्षल भाबड, उपशहरप्रमुख वाल्मिकआप्पा आंधळे, प्रवीण धाकराव, दिनेश घुगे, पंडीत सानप, युवासेना शहरप्रमुख अंकुश गवळी, म्युन्सिपल कामगारसेना अध्यक्ष नितीन पाटील, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख योगेश ईमले, अपंगसेना शहरप्रमुख काशिफ शेख, शिवसेना आरोग्यकक्ष शहरप्रमुख विकास वाघ, शहर संघटक बाळू माळवतकर, निलेश ताठे, मुराद शेख, महेंद्र गरुड, लोकेश साबळे, शहर सचिव राजाभाऊ धोंडगे, युवासेना ता सचिव सचिन दरगुडे, स्वराज देशमुख, हर्षल पाटील, प्रवीण सूर्यवंशी, ललित रसाळ, चेतन मराठे, गणेश सांगळे, राहील मनसुरी, रियाज शेख, राजाभाऊ मुसमुडे, अरुण नगे, सचिन दरगुडे, नंदू पीठे, बाळासाहेब निकम, रऊफ शेख इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here