नगरसेवकांनी इतर कामांसोबत संस्कृती ( Culture ) ही जपावी – आ. चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व असे होऊन जातात ज्यांच्या स्मृती जाग्या ठेवायच्या असतात, नगरसेवक काम करत असताना त्यांनी हे भान ठेवले पाहिजे की नागरी सुविधांच्या बरोबरीने आपण ज्या प्रभागात राहतो तेथील मोठया व्यक्तींच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत. संस्कृती जतन करणे हीच संस्कृती असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पंडित भास्कर चंदावरकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नावं देण्याचा कार्यक्रम हा केवळ ते या ठिकाणी वास्तव्यास होते म्हणून नव्हे तर त्यांनी ह्या रस्त्यावर वृक्षारोपण केले, शिल्प उभारले व ते ह्या रस्त्याची स्वच्छता देखील करायचे, त्यामुळे त्यांचे ह्या रस्त्याशी असलेले नाते पाहता त्यांचे नावं ह्या रस्त्याला दिल्याबद्दल मी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अभिनंदन करतो असेही आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. पंडित भास्कर चंदावरकर पथ नामकरण सोहोळ्याच्या वेळी ते बोलत होते.यावेळी प्रसिद्ध गायक आनंद भाटे, ह्या रस्त्याच्या नामकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, श्रीमती मीना चंदावरकर, रोहित चंदावरकर,दीपक पोटे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, वीरेंद्र चित्राव, पुनीत जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. मीनाताईं कडून भासकरजींच्या आठवणी ऐकताना त्यांच्या तरल स्वभावाचा परिचय झाला, मीनाताईंना जर्मनीतील एका रस्त्यावर पालापाचोळ्यातून चालताना होणारा आवाज आवडायचा, एके दिवशी त्या अभिनव शाळेतून घरी येताना भास्कर रावांनी त्यांना मागच्या गल्लीतून येण्याची सूचना केली व त्याठिकाणी त्यांनी पालापाचोळा आणून टाकला होता व अश्या पद्धतीने त्यानी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केल्याची आठवण त्यांच्या तरल स्वभाव दर्शविणारी असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. आंनद गंधर्व म्हणजे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी ही भास्करजींच्या स्मृती जागविल्या. मला शाळेत असताना त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला असल्याचा उल्लेख करतानाच त्यांनी व मीनाताईंनी मला गायनासाठी प्रोत्साहन दिल्याचे ही आंनदजींनी सांगितले. मीना टीचर यांची ही इच्छा मी पूर्ण करू शकले याचा मला आनंद होतो असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चंद्रकांतदादांनी सुचविल्याप्रमाणे याठिकाणी आपण शिल्प ही उभारू असेही सौ. मंजूश्री खर्डेकर यांनी सांगितले.यावेळी मीनाताई व रोहित चंदावरकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर गायत्री चंदावरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here