पोस्टातर्फे जागतिक योगदिनानिमित्त विशेष कँन्स्लेशन शिक्क्याचे अनावरण..

0

मुंबई :  सोमवार दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त पोस्ट विभाग तथा इंडिया पोस्ट विशेष कँन्स्लेशन शिक्क्यांसह येत आहे. हा अनोखा उपक्रम २०२१ च्या सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून भारतीय पोस्टाने भारतभरातील ८९० प्रमुख पोस्ट ऑफीस च्या माध्यमातून सचित्र रचनेद्वारा विशेष कँन्स्लेशन शिक्का जारी केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. हे आजवरच्या सर्वात मोठ्या एकाचवेळी फिलाटेलिक स्मरणाऱ्या पैकी एक ठरणार आहे. सर्व डिलिव्हरी आणि नॉन डिलिव्हरी हेड पोस्ट ऑफीस २१ जून २०२१ रोजी कार्यालयात बुक केलेल्या टपालावर विशेष कँन्स्लेशन शिक्का उमटवतील आंतरराष्ट्रीय योगदिन २०२१ गये ग्राफिकल डिझाईन्स शास्त्रीय रचनेचा ठसा किंवा चिन्ह हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असेल, कँन्स्लेशन शिक्का म्हणजे डाक चिन्हान्कित म्हणून वापरले जाते, ज्याचा वापर मुद्रांक पुन्हा वापरण्यापासून रोखण्यासाठी व मुद्रांक रद्द करण्यासाठी वापरला जातो. २०१५ मध्ये डाकविभागाने आंतराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशी दोन शिक्क्यांचा संच आणि एक लघुपत्रक प्रसिद्ध केले. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी द्वितीय आंतराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतीदिनानिमित्त सूर्यनमस्कार वरील स्मारक टपाल तिकीट जाहीर केली. २०१७ मध्ये यूएन. पोस्ट प्रशासनाने न्यूयार्क मधील आंतराष्ट्रीय योगदिनाचे स्मरण करण्यासाठी दहा योगासन दर्शविणाऱ्या शिक्क्यांचा संच जारी केला. यंदा कोविड महामारी आहे. याचा विचार केल्यास अनेक कार्यक्रम व्हर्चुअली होतील व या वर्षाच्या मुख्य विषयाला योगाबरोबर रहा. घरी रहा असे प्रोत्साहन देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here