अखेर मटाने येथील शेतकऱ्यांना शिवार रस्ता मिळाला!! राष्ट्रवादी यु.काँ.ता. अध्यक्ष सुनील आहेर यांची मध्यस्थी

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो.९१३००४००२४ ,देवळा- तालुक्यातील मुख्य मार्गावर असलेले मटाने गावातील बस स्टॅन्ड लगत असलेले आंबेडकर नगर ते पाट कॅनॉल या १.५ कि.मि. पांदन रस्त्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटू आबा) आहेर यांच्या हस्ते दि.१८ जून रोजी शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून येथील ५०ते ५५ शेतकऱ्यांना भेडसावणारी मुख्य समस्या पांदन रस्ता ही होती त्यातील २०ते २५ शेतकऱ्यांना आपला तयार झालेला शेतमाल बाजारात विक्रीस नेने अतिशय जिकिरीचे असल्याने त्यांची कुचंबणा होत होती पावसाळ्यात तर अतिशय बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते अनेक वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्ता तयार करण्याचे प्रयत्न केले परंतु त्यास यश येत नव्हते, वाखारी जि. प. गटात रा. यु.काँ. तालुका अध्यक्ष सुनील (गोटू आबा) आहेर यांनी लोक सहभागातून “शेत तेथे पांदन रस्ता” ही संकल्पना घेऊन काम सुरु केले असल्याने स्थानिक शेतकरी ग्रा.पं. सदस्य समाधान केदारे, भाऊसाहेब ठुबे, जनार्दन पाटील या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली असता सुनील आहेर यांनी दि.१८ जून रोजी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांना शेतीसाठी पांदन रस्त्याचे महत्त्व समजावून सांगत समुपदेशन केल्याने काही शेतकऱ्यांचा असलेला विरोध मावळला व सर्वांनी एकत्रित होऊन आपापल्या शेतातील जागा रस्ता तयार करण्यासाठी देण्यास सहमती दर्शवल्याने काही तासातच जे.सी.बी. मशीन बोलावून आहेर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकसहभागातून आंबेडकर नगर ते पाट कॅनॉल या १.५ कि.मि. रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला व अखेर ५० ते ५५ शेतकरी बांधवांना रस्ता उपलब्ध झाला. यावेळी समाधान केदारे, भाऊसाहेब ठुबे, जनार्दन पाटील, शिवाजी ठुबे, साहेबराव ठुबे, संदीप ठुबे, दादाजी केदारे, राजाराम केदारे, प्रकाश केदारे, गणपत केदारे, रमेश केदारे, चंद्रकांत ठुबे, दादाजी वाघ, लक्ष्मण केदारे, गंगाधर केदारे, दादाजी केदारे, छोटू केदारे, नानासाहेब आहेर, शंकर वाघ, अण्णा साबळे, दिपक साबळे, तानाजी आहेर, दादाजी आहेर, ग्रा.पं. सदस्य रवींद्र केदारे, कौतिक ठुबे, राजेंद्र थोरात, समाधान दादाजी केदारे, शशिकांत केदारे, रामदास केदारे, चिंतामण थोरात, खंडेराव केदारे, बाळू केदारे, महेंद्र केदारे, संजय केदारे, वसंत केदारे, रामदास केदारे, भिका केदारे, मधुकर दानी, नानाजी साबळे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here