
मनमाड : गेल्या वर्षभरापासून कोविड-१९ कोरोना सर्वत्र धुमाकुळ घातला आहे.त्यामुळे अनेकांची काहीतरी खान्यावाचून अड़चन होत असल्याने येथील एका तरुणांने अवघ्या पाच रूपयात वडापाव उपलब्ध करून दिल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वेळोवेळी टाळेबंदी घोषित केली. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आले असतानाच ही गरज ओळखून शहरांमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने अवघ्या पाच रुपयात वडापाव देत असल्याने या उपासमारी मध्ये गरजू व्यक्तींची पोटाची खळगी भरत आहे.मनमाड शहरातील नेहरू रोडवर असलेल्या जय महाराष्ट्र वडापाव सेंटर हे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले या जय महाराष्ट्र वडापाव सेंटर चे मालक सतीश परदेशी यांनी सध्याची परिस्थितीची जाण ठेवून आणि कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे पालन करून अवघ्या पाच रुपयात वडापाव देत असल्याने शहरातील सर्वच थरातील असंख्य नागरिक या जय महाराष्ट्र वडापाव सेंटर ला भेट देवून घरी घेऊन जात आहे.यामुळे सकाळच्या सुमारास या सेंटर वर अवतीभवती नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद.आज पर्यंत ताळेबंदित शहरातील गुरुद्वारा प्रशासनातर्फे अनेकांची पोटे भरली जात असतांना आता देखील निशुल्क गुरुद्वारा प्रशासनातर्फे गरजूंना अन्नदानाचा कार्यक्रम शहरात सुरूच आहे.मात्र वडापाव असा पदार्थ आहे.की तो सर्वांनाच खावासा वाटतो.त्यामुळे या तरुणांने तो उपलब्ध करून दिला आहे.दरम्यान आजच्या परिस्थितीमध्ये किराणा मालाचे आणि वडा पाव तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूचे किमती हे गगणाला भिडले आहेत.अशा परिस्थितीत देखील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर हे सर्वसाधारण व्यक्तींचे पोटाची खळगी भरत असल्याने सर्वत्र नागरिकांन कडून कौतुक होत आहे.टाळेबंदीमुळे सर्व व्यापार ठप्प झाल्यामुळे हात मुजरा वर उपासमारीची वेळ आली आहे. याच अनुषंगाने शहरातील एखादा व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून “ना नफा, ना तोटा ” या तत्त्वावर १० रूपायात दोन वडे आणि दोन पाव देण्यामागचा उद्देश आहे. – सतीष परदेशी, जय महाराष्ट्र वडापाव सेंटर
