जनजागृती सेवा समितीचे कार्य कौतुकास्पद-राजेश कदम

0

मुंबई – माथेरान-बदलापुर येथील जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या संस्थेने पुढाकार घेऊन माथेरान मधील दिडशे कुटुंबाना जीवनावश्यक साहित्य देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. यानिमित्ताने अत्यंत दुर्गम आणि पहाडी भागातील कोकणवासियांचे जीवन जवळुन पहाता आले.प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत या बळावर येथील कोकणी माणसाने आपली संस्कृती जपली आहे. जनजागृती सेवा समितीचे हे सत्कार्य कौतुकास्पद व प्रशंवसनीय आहे. या उपक्रमाबद्दल मी संपुर्ण कार्यकारिणीला धन्यवाद देतो.असे गौरवोदगार स्टार हेल्थ अॅन्ड अप्लाईड इन्शुरन्स कंपनीचे(क्लब संस्थापक-रोटरी क्लब डायमंड)सिनीयर सेल्स मॅनेजर राजेश कदम यांनी काढले.याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत,कोकण वासीय समाजाचे अध्यक्ष शैलेंद्र दळवी,सचिव चंद्रकांत सुतार यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी जनजागृती सेवा समितीच्या पदाधिका-यांच्या हस्ते येथील कोकणवासीय गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.यावेळी समितीचे दत्ता कडुलकर,महेश्वर तेटांबे,दीपक वायंगणकर हे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कोकणवासीय समाजातर्फे योगेश दळवी,दत्ता सणगरे आदी मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्षा सौ.प्रेरणा सावंत यांनी आपला शुभेच्छा संदेश पाठविला.समितीचे सल्लागार आत्माराम नाटेकर यांनी सुत्रसंचलन केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश कदम,समिती कार्यकारिणी व जनजागृती सेवा समिती ग्रुप सदस्यांचे विशेष योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here