
नांदगाव – उपजिल्हा रुग्णालय मनमाड, व प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल कोविड सेंटरसाठी ६ व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात आले.तसेच आमदारांतर्फे नांदगांव मतदार संघातील सर्व ग्रामपंचायत, नांदगांव, मनमाड नगर परिषद यांना प्रत्येकी ५० लिटर सॅनेटाईझर व सर्व आशा सेविकांना, पीपीई कीट, साडी, मास्क, हँडग्लोज व सॅनेटाईझर देण्यात आले. तसेच विजेचा शॉक लागून मृत्यू झालेले ढेकु ता. नांदगांव येथिल ग्रामपंचायत कर्मचारी कै.सोपान चव्हाण यांच्या पत्नी रेखा सोपान चव्हाण व कुटुंबियांना आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या माध्यमातून ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली असुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देखिल मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. वऱ्हाणे ता. मालेगांव येथिल शालेय विद्यार्थिनी सोनाली सुभाष गांगुर्डे व शुभांगी हनुमान पवार यांचा गससिलेंडरचा स्पोट होऊन अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना देखिल राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह योजनेतुन प्रत्येकी ७५ हजार रुपये आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नांदगांव नगराध्यक्ष राजेश कवडे, विष्णू निकम सर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सभापती सुभाष कुटे, माजी सभापती विलास आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तेज कवडे, उपसभापती राजेंद्र देखमुख, संतोष गुप्ता, विलास आहेर, आनंद कासलीवाल, अमोल नावंदर, संग्राम बच्छाव, येसगांव चे सरपंच सुरेश शेलार, मालेगांव शिवसेना तालुका प्रमुख पंकज निकम, महेंद्र दुकळे, उंबरदे सरपंच विजय इप्पर, काँग्रेस तालुका अध्यक्ष समाधान पाटील, महावीर पारख, युवसेना जिल्हा प्रमुख फरहान खान, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, शहर प्रमुख सुनिल जाधव, युवसेना तालुका प्रमुख सागर हिरे, ग्रामीण रुग्णालय नांदगांव वैद्यकीय अधिक्षक डॉ.रोहन बोरसे, उपजिल्हा रुग्णालय मनमाड वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद नरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ससाणे, आशा सेविका व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
