मा.डॉ.हर्षवर्धन केंद्रीय आरोग्यमंत्री , भारत सरकार मा.राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती

0

मनमाड – मा.डॉ.हर्षवर्धन केंद्रीय आरोग्यमंत्री , भारत सरकार मा.राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेशी … देशामध्ये सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच राज्यामध्ये कोरोना लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात भर दिली जात असतांना रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या हमाल ( कुली ) रेल्वे वेटण वेंडर तसेच सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे . कारण सध्या देशाच्या काण्या कोपऱ्यामध्ये जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू असतांना अनेक प्रवासी प्रवास करीत आहेत . या प्रवाश्यांच्या सामानाची ने आण करण्यासाठी रेल्वे स्थानकावर काम करणारे हमाल काम करीत आहेत . तर दुसरीकडे प्रवाश्यांना खाद्य येय उपलब्ध करून देणाऱ्या वेटर वेंडर यांचा सुद्धा संपर्क प्रवाश्यांशी येत असल्यामुळे याच अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन सो तसेच राज्याच्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे असंघटीत अमीक कामगार जनरल युनियनच्या वतीने देशातील सर्व रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या असंघटीत कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण होणे गरजेचे आहे . अशी मागणी केली असून राज्यातील मुंबई , मनमाड , नागपूर , भुसावळ , पुणे , दौंड , इगतपुरी , कल्याण व इतर महत्वपुर्ण रेल्वे जक्शनवर या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे . सध्याच्या परिस्थितीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना लसी करणासाठी प्राधान्य दिले जात असून त्याच धर्तीवर रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या कामासाठी नेहमीच तत्पर असलेल्या या असंघटीत कर्मचाऱ्यांना तातडीने लसीकरण होणे गरजेचे आहे . असंघटीत श्रमीक कामगार जनरल युनियनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बळवंतराव आव्हाड यांनी केली असून याकडे केंद्र व राज्य सरकारनी गांभीर्याने लक्ष दिल्यास कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला या कर्मचाऱ्यांना लसीकरण जर ताबोडतोब केले तर या कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे निश्चित चांगले राहील व त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना सुद्धा सुरक्षीतता मिळू शकेल यात शंका नाही , असे पत्र पाठवण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here