वासोळ परिसरात सध्या कडाक्याच्या तापणाऱ्या तडपत्या उन्हातही खरिपाचे शेती मशागतीचे कामाला जोमात सुरुवात

0

प्रशांत गिरासे वासोळ प्रतिनिधी – यंदा मान्सून कसा असेल याचा विचार न करता शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी लगबग सुरु केली आहे देवळा तालुका सह वासोळ परिसरातील गावगाड्यात सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला असून नांगरणी ,रोटा,बेलापाडणे ,पास मारनणे ही कामे सध्या कडाक्याचे तापणाऱ्या तळपत्या उन्हात ही सुरू आहेत चार्‍या पाण्याअभावी बैलांची संख्या कमी होऊ लागल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे करून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हवामानात देखील बदल झाला ना दिसतोय.कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्न संख्येमुळे सततच शासना कडून लाँकडाऊन व कळक निर्बंध लावण्यात येत असल्याने बाजारपेठा बंद राहत असल्याने व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला असल्याने  आर्थिक गणित जुळवताना शेतकऱ्यांची चांगलीच ओढाताण होत आहे वासोळ परिसरात खरीपांसह सह रब्बीचे पिके शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असत परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अल्प प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे उन्हाळ्यात नदी-विहिर ,तलाव कोरडे पडतात. यंदा बागायती ऊस ,कांदे , गहू या पिकात कमालीची घट दिसून येणार असून शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकांकडे वळावे लागणार आहे. मका पिकांपेक्षा तोर,सोयाबीन , कांदा, डाळिंब पिकांकडे शेतकऱ्यांचा जास्त कल राहणार आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अल्प पाऊस झाल्याने विहिरी बोअरवेल ने तळ गाठला त्यामुळे खरीपा सह रब्बी हंगामही वाया गेला वासोळ परिसरात यंदा निम्म्याहून कमी रब्बी हंगामाची पेरणी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आता शेतकऱ्यांना आगामी हंगामाची चाहूल लागली आहे यंदाचे वर्ष जरी अल्प प्रमाणात पाऊस पडला असले तरी येणार्‍या हंगामात तरी चांगला पाऊस होऊन उत्पन्न चांगले मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे नांगरनी, कुळवणी, बेलापाडणे, पासमारणे ,रोटा मारल्यानंतर उन्हाने शेत तापल्यास पोत सुधारतो असा शेतकऱ्यांचा समज आहे त्यामुळे सध्या नांगरणीचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. डीझेल चे भाव वाढल्यामुळे शेतकर्याणी थोडी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here