ब्राह्मण महासंघ स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोहीम राबविणार – आनंद दवे

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारत रत्न प्रदान केले पाहिजे मात्र ते करत असताना सावरकरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. हिंदुत्वाचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे व हिंदुत्वाची व्यापक व्याख्या देखील लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले. ब्राह्मण महासंघाच्या वतीने क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन च्या सहकार्याने पौरोहित्य करणाऱ्या गरजू ब्रह्मवृंदास आज किराणा साहित्य प्रदान करण्यात आले त्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, जनता सहकारी बँकेच्या संचालिका अलकाताई पेठकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुल माधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे, अभी ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज चे जितेंद्र जोशी, ब्राह्मण महासंघाचे श्रीपाद कुलकर्णी, मनोज तारे, , मयुरेश अरगडे, हर्षद ठकार,महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष सौ. मधुरा बर्वे, ऍड नीता जोशी इ उपस्थित होते.परशुराम जयंतीच्या शुभदिनी *स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारत रत्न द्यावे या मागणी साठी ब्राह्मण महासंघ राज्यभर ऑनलाईन मोहीम सुरु करत असल्याचे आनंद दवे* म्हणाले.या ऍप चे उदघाटन विक्रम गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अलकाताई पेठकर व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते मैत्रीयी पतसंस्थेच्या संगणकीकरनाचे उदघाटन करण्यात आले.ग्रामीण भागातच नव्हे तर ब्राह्मण समाजातील शहरी भागातील अनेक कुटुंबांची परिस्थिती हलाखीची असून त्यांच्या उत्तथानासाठी *ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर* यांनी मांडली. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने जिथे कमी तिथे आम्ही हे ब्रीद अंगीकारले असून समाजातील सर्व स्तरातील गरजूना ह्या संकटकाळात मदत करत असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी जितेंद्र जोशी, मंजुश्री खर्डेकर, अलकाताई पेठकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. श्रीपाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, आंनद दवे यांनी प्रास्ताविक तर ऍड नीता जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here