मेशी येशील आरोग्य केंद्रात परिचारिका दिन साजरा

0

नाशिक – देवळा तालुक्यातील मेशी येथील आरोग्य केंद्रात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणून परिचारिका दिन साजरा करण्यात आला. परिचारिकांचे महत्त्व अताच्या कोविड काळात अजुन प्रभावी झाले आहे. ज्यावेळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही प्रियजनांना कळते, त्यावेळी रक्ताची नाती इच्छा असूनही जवळ येऊ शकत नाही. अशावेळी डॉक्टरांचा राऊंड झाल्यावर त्या रुग्णांची सर्वस्वी काळजी या परिचारिका म्हणजेच नर्स घेतात. हे सर्व करत असताना त्या सीमेवरील जवानाप्रमाणे आपले प्राण तळहातावर घेऊनच कोरोना रुग्णांची सेवा करतात. कधी संसर्ग होईल हे सांगत येत नाही; परंतु संसर्ग होईल या भीतीने त्यांनी कधीच रुग्णांना वाऱ्यावर सोडले असे कधीच घडले नाही. त्यामुळे परिचारिकांना धिर, दिलासा, आणी प्रेम मिळावे म्हणून मेशी ता. देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका दिन साजरा करण्यात आला. मेशी येशील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती मोरे यांनी आपल्या स्टाफ सोबत फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस साजरा करुन परिचारिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. कोरोना काळात दिले परिचारिकांनी महत्वाचे योगदानआधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्व जण घरबंद झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशाही स्थितीत परिचारिका या मोठ्या हिमतीने रुग्णसेवेला प्राधान्य देतात. गेल्या वर्षभरापासुन पहिला कोरोना रूग्ण निघाला त्यावेळी पासून आतापर्यंत कोविड रुग्णालयात सुरू असलेले कर्तव्यपालन हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयातही परिचारिकांचे कर्तव्य हे सॅल्यूट करणारेच आहे.जगभरात आज (12 मे) आंतरराष्ट्रीय नर्स दिन साजरा केला जात आहे. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला आज त्यांचा जन्मदिवस मेशी येथील आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला.यावेळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती मोरे, आरोग्य सहाय्यक व्हि.डी गरुड, बी.बी सोनवणे, पी.आर सांघवी, क्रांती जाधव, संजिवनी भामरे , नंदाळे सर, ईडोळे, बैरागी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here