पवित्र रमजान महिन्यात विधवा, दिव्यांग, आर्थिक दुर्बल मुस्लिम घटकांना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याकडून मदतीचा हात

0

वासोळ -प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. 9130040024,मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिम महिला, पुरुष, लहान बालके यांचे रोजा (उपवास) सुरू होते, मात्र जिल्ह्यात कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने मुस्लिम समाजातील काही कुटुंब आर्थिक विवेचनेत सापडली असताना बुधवार दि. १२ /०५ २०२१ रोजी किराणा साहित्यांचे आज लोहोणेर ठेंगोडा येथील विधवा, दिव्यांग, आर्थिक दुर्बल मुस्लिम घटकांना भाजप जिल्हाध्यक्ष अध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य सतिष सोमवंशी, रतिलाल परदेशी, रमेश आहिरे, धोंडू आहिरे, निंबा धामणे, प्रसाद देशमुख, ग्रामविकास अधिकारी यु.बि. खैरणार योगेश पवार, गणेश शेवाळे, मुकुंद मेतकर मुस्लिम पंचकमेटीचे अध्यक्ष जाकिर शेख, सुलतान शेख, जकिर मन्सुरी, हमिद मन्सुरी, सदाम मन्सुरी, शाकिर शहा अल्ताफ शेख, शहारुख शेख, जाकिर मन्सुरी, मुनिंर मन्सुरी, मोसिन मन्सुरी, दानिश शेख, नाना जगताप आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी तसेच रमजानच्या पवित्र महिन्यात मदतीचा हात दिल्याने मला व्यक्तिगत समाधान आणि मुस्लिम समाजातील कुटुंबाला मदत मिळल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटां पाहून मनस्वी समाधान मिळाले*केदा आहेर,जिल्हाध्यक्ष भाजप*कोरोना च्या विळख्यात समाज सापडल्याने मंगळवार दि. ११/०५ रोजी केदा नाना आहेर यांना त्यांच्या वॉट्सप वर मी स्वतः संदेश पाठवला कि नाना आर्थिक संकटात सापडलेल्या काही मुस्लिम कुटुंबाला किराणा साहित्यांची मदत करावी आणि आज बुधवार दि.१२ रोजी आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाना मदत करण्यात आली.
जाकिर शेख मुस्लिम पंचकमेटी लोहोणेर ठेंगोडा
आज आम्हाला भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर यांनी आमच्या पवित्र रमजान महिन्यात रोजा सोडवण्यासाठी किराणा साहित्यांची मदत केली त्यांसाठी त्यांचे मनापासून आभार तसेच केदा नाना आहेर यांना अल्लाताला निरोगी दिर्घायुष्य देवो – मुमताज मन्सुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here