आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम “मदतीचा एक घास” या उपक्रमाचा शुभारंभ

0

सोलापूर:  शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम ” मदतीचा एक घास” हा उपक्रम सुरु करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथील पत्रकार परिषदेत सांगतिले. उदयापासुन लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागातील जवळपास रोज एक हजार गरजुना जेवन पुरविण्यात येणार आहे. आणि टप्प्याटप्प्याने यात अजुन वाढ करण्यात येणार आहे.यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापूर शहर एक गिरणगाव म्हणून ओळखले जाते शहरात सर्व प्रकारचा कामगारवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. बिडी कामगार बांधकाम कामगार यंत्रमाग कामगार रोजंदारीवर काम करत असलेले कामगार घरेलू कामगार व इतर असंघटित कामगार पडेल ते काम करत असलेले कामगार असे गोरगरिबांचे शहर आहे. त्यांचे रोजचे हातावरचे पोट आहे अशा कामगारांना गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून खूप त्रास झाला आहे ते आर्थिक संकटात आहेत व त्यांचे उपासमार होत आहे. त्यामुळे असून शारीरिक व मानसिक विवंचनेत आहेत. अशा व्यक्तींना आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना काहीतरी मदत करावी या प्रामाणिक इच्छेने एक खारीचा वाटा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल पुढे सरसावले असून या अनुषंगाने प्रत्येक महिला कार्यकर्त्यांच्या घरातून प्रत्येकी 20 चपात्या व भाजी देण्याचा व संकलित करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला जवळपास शंभर महिला कार्यकर्ते यामध्ये सहभागी होऊन योगदान देणार आहेत. टप्प्याटप्प्याने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह अनेक जन यात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून जमा झालेले चपाती भाजी व अन्न सोलापुरातील विविध भागातील गरजु नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार प्राणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच दानशूर व्यक्तीनी यासाठी धान्य व इतर वस्तु देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी आ. प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर अलकाताई राठोड, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका पनवीन इनामदार, वैष्णवीताई करगुळे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रियदर्शिनी सेलचे श्रद्धा हुल्लेनवरू प्रियांका डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, कमरूनिस्सा बागवान, वीणाताई देवकते, महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल पदाधिकारी उपस्थित होते.( जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here