रेमडीसीविर काळाबाजार व नियत्रण !

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,सद्यस्थितीत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मागणी व पुरवठ्यात तफावत होत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुटवडा जाणवत आहे.इंजेक्शनचे वाटप आणि नियंत्रण यावर्षी FDA कडून काढून कलेक्टरांच्या माध्यमातून केलेलं आहे, कारण एप्रिलमध्ये साठेबाजी आणि काळाबाजार खूप वाढला..पूर्वी इंजेक्शनचा प्रवास उत्पादक–स्टोकिस्ट/होळसेलर/डिस्त्रीबुतर — रेटेलर (मेडिकल स्टोअर) असा होता. आता कलेक्टरांच्या नियंत्रणाखाली उत्पादक ते थेट कोव्हीड सेन्टर असा प्रवास होत असल्याने बाजारात कुठेही इंजेक्शन मिळणार नाही.तरीही काही हॉस्पिटलमध्ये UNETHICAL PRACTICES सुरू आहेत, ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रोजचा कोटा शिल्लक असूनही नॉर्मल पेशंटला सुद्धा सर्रासपणे 6, 6 (काही हॉस्पिटल 10 देत आहेत) इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन देत आहेत,परिणामी ते पेशंट्सचे नातेवाईक बाहेरच्या काळा बाजारवाल्यांच्या गळाला लागून मजबुरीने 1 हजाराचे इंजेक्शन 20,30 हजारात घेत आहेत.अशावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी –1) त्या संबंधित डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला वरील कार्यपद्धती/नियम सांगून त्याच हॉस्पिटलमधून नियमानुसार इंजेक्शन द्यायला भाग पाडावे.2) तरीही ते दाद देत नसल्यास कलेक्टर ऑफिसमधील संबंधित अधिकाऱ्यांना त्या हॉस्पिटलमध्ये फोन करण्याची विनंती करावी,3) तरीही यश मिळालं नाही तर ते प्रिस्क्रिप्शन घेऊन त्या एरियातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणे. या बॅड आणि UNETHICAL प्रॅक्टिसिस विरुद्ध Disaster Management Act खाली गुन्हे दाखल करण्याचीही तरतूद आहे.परंतु, वरील सर्व करण्यापूर्वी खालील माहिती लक्षात घ्यावी–
पेशंटचा HR CT स्कोर –
1 ते 7/25 असल्यास तो नॉर्मल पेशंट असतो,
8 ते 16/25 असल्यास MODERATE असतो आणि 17 ते 25/25 असल्यास तो SEVERE असतो..ICMR/आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणे नॉर्मल पेशंट्सना रेमदेसीविर किंवा TOCILIZUMAB/ ACTEMRA किंवा ITILOZUMAB इंजेक्शन देता येत नाही,
पेशंट MODERATE TO SEVERE जाऊ नये म्हणून त्याला आणि SEVERE ICU पेशंट्सना द्यावे लागते..वरील सर्व गैरप्रकार फक्त काही मोजक्या हॉस्पिटलमध्येच सुरू आहेत,सर्वच ठिकाणी नाही. बरेच खाजगी हॉस्पिटल खूप चांगली सेवाही देत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here