भारतीय मानवाधिकार परिषदेच्या देवळा तालुका प्रवक्ता पदी केदारे

0

वासोळ : प्रतिनिधी प्रशांत गिरासे
मो. 9130040024,भारतीय मानवाधिकार परिषदेच्या देवळा तालुका प्रवक्ता पदी पत्रकार वैभव केदारे यांची निवड करण्यात आली.मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया यांच्या आदेशाने व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक केदारे व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक देवरे यांच्या वतीने केदारे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.केदारे यांच्यातील कौशल्य गुण पाहून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे असे यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक केदारे यांनी सांगितले.यावेळी सक्रिय सभासद ललिता गरुड, भारती गायकवाड,हिरकणी राठोड, सरुबाई बोरसे यांनाही नियुक्ती पत्र देण्यात आले.प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दोधा पवार,जिल्हा सचिव संदीप केदारे,देवळा शहराध्यक्ष विजय पाटील, देवळा तालुका महासचिव देविदास बोरसे,देवळा तालुका महिला सचिव शोभा पवार,योगेश गायकवाड,दीपक पवार,नानाजी जगताप आदी.उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here