मराठा तेतूका बुडवावा ! महाराष्ट्र धर्म संपवावा !

0

मनमाड – सुप्रीम कोर्टाच्या मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या निर्णयामुळे ही नवी उक्ती आता प्रचलीत होउ शकते. देशातील अनेक राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडली असतांना केवळ महाराष्ट्रातील मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेत आहे. सर्व सुविधानात्मक प्रक्रियेतून आरक्षण दिले असतांना हे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सकारात्मक असतांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात जाणे हे सर्व आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. मराठा समाज लाखोंचे मोर्चे संविधानाच्या चौकटीत राहून शांततेत काढतो, संविधानाला मनापासून मानतो हे काही देशविघातक विकृत मनोवृत्ती असणाऱ्या घटकांना आवडत नाही असे वाटते. ही प्रवृत्ती मराठा समाजाचे विशेषतः तरुणांचे डोके खराब (बुद्धिभेद) करून मोठ्या संख्येने असणाऱ्या या समाजाला कायदा हातात घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी (नक्षलवादाकडे घेऊन जाण्याकडे) आखलेले हे षडयंत्र आहे काय? अशी शंका येत आहे. परंतु हे ओळखून मराठा समाजातील जाणत्यांनी समाजाला भरकटू न देता योग्य दिशा देणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढाई हारणे अथवा हारण्यासाठी सगळी तजवीज करणे हा षडयंत्राचा एक भाग असू शकतो.परंतु ही कायदेशीर लढाई संपलेली नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत संपणारही नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आत्मसात केलेला मराठा आता नव्या जोमाने परत *”बचेंगे तो और भी लढेंगे”* या दत्ताजी शिंदेंच्या वाक्याप्रमाणे परत लढण्यास तयार आहे.न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही आमच्या न्याय हक्कांपासून वंचित राहू शकत नाही. ही फक्त एक प्रक्रिया आहे आणी ती परत तपासली जाऊन शकते. हातपाय गाळून निराश होण्याची गरज नाही. आपण छत्रपतींचे मावळे आहोत. गनिमी कावा आमच्या बरोबरच खेळला जातो आणि आम्ही त्यास बळी पडतो यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. बहुजन हिताय! बहुजन सुखाय!! चा मूलमंत्र आम्ही जपत असतांना बहुजनातील मोठा घटक आज धोक्यात आला आहे. तेंव्हा सर्वाना सोबत घेऊन परत आता नव्या लढाईची तयारी करू, आपल्या अजाणतेपणी घडलेल्या चुका शोधून परत एकत्र येऊन नवी दिशा ठरवू. लढाई अजून संपलेली नाही.मयुर बोरसे. अध्यक्ष, मराठा समाज मंडळ.मनमाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here