महाराष्ट्र संरक्षण संघटनेची खालापूर कार्यकारणी जाहीर !!

0

मुंबई – तालुका अध्यक्ष पदी निखिल पाटील, धनंजय अमृते , शिवतेज तावडे यांची उपाध्यक्षपदी वर्णी !!जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,खालापूर – रायगड जिल्हा : मराठी भाषा,मराठी संस्कृती संवर्धन, अलिप्त होत चाललेल्या मराठी शाळा टिकवणे तसेच मराठी मुलांना नोकरी व व्यवसायात येणाऱ्या अडचणींना वाचा फोडणे आणि मराठी माणसाला न्याय व त्यांचे हक्क मिळवून देणे यासाठी महाराष्ट्र संरक्षण संघटना मागील १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबई येथून सुरु झालेली ही संघटनात्मक चळवळ आता महाराष्ट्र भर आपले कार्यक्षेत्र विस्तारित करत आहे.विविध जिल्हा तालुक्यांमधून मराठी साठी कार्यतत्पर असे स्वयंसेवक एकत्रित करून या बिगरराजकीय चळवळीद्वारे मराठी साठी व्यापक स्वरूपात कार्य व्हावे या साठी संघटनेच्या वरिष्ठ मंडळींकडून सध्या जोरदार बांधणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग व मार्गदर्शक प्रमोद मसुरकर तसेच संघटनेचे सल्लागार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेने रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय भोसले यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या खालापूर तालुका अध्यक्ष पदी निखिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपध्यक्ष पदी धनंजय अमृते व शिवतेज तावडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे त्याच प्रमाणे तालुका कोषाध्यक्ष पदी तुषार देशमुख, खोपोली शहर अध्यक्ष पदी सुमित पाटील तर शहर उपाध्यक्ष पदी असिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीचे संगठणेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सदस्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here