
मुंबई : सामजिक कार्यकर्ते अमोल वंजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल तर्फे मुंबई महासचिव पदी असताना त्यांनी केलेल्या सामजिक आणि दैदिप्यमान कार्याची योग्य दखल घेऊन .त्यांची मुंबई अध्यक्ष म्हणुन नुकतीच नियुक्ती करण्यात आली त्या प्रित्यर्थ UHRC च्या पदाधिकारी यांच्या वतीने तसेच युवासेना शिवडी विधानसभा समन्वयक मितेश साटम याच्या हस्ते त्यांचा शाल यथा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दादर ब्लॉक अध्यक्ष सचिन जोईजोडे यांच्या पत्नी सौ.निता सचिन जोईजोडे यांची ठाणे शिवसेना शाखा संघटक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा देखिल सत्कार शिवसेना मा.आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या कन्या सौ.रेश्मा सकपाळ-गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आणि सोशल डिस्टेन्स चे भान राखून शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा दिमाखात संपन्न करण्यात आला. याप्रसंगी UHRC चे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जितेंद्र दगडू सकपाळ, सौ.नम्रता जितेंद्र सकपाळ, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.अनिता घोष, किशोर घोष, ठाणे ब्लॉक अध्यक्ष सौ.दीपाली महाले, दादर ब्लॉक अध्यक्ष सचिन जोईजोडे, चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज, चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्ष सुहास परब, सौ.आरती अमोल वंजारे, सौ.दर्शना पाटील, सौ.साक्षी कांबळे, नंदकिशोर बागवे, मानली खैरे, राकेश बामणे, वैभव गुलगुले, अभिषेक घाणेकर, मंगेश कदम, विजय आंबेकर, अरुण दुखंडे, नील सकपाळ, नीरजा सकपाळ, श्रावणी वाळुंज व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
