घुणा !!

0

मुंबई : जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे चालू वेगाने धावणाऱ्या वाहनाला जीवनाला थांबण्यासाठी लावला जाणारा अडसर किंवा एखादी वस्तू वेळ म्हणजे घुणा होय.
जरा मागें जाऊया खेडेगाव साधी झोपडी वजा मातीची घरे जी उन्हाळ्यात थंड असायची. पावसाळ्यात उबदार असायची कृत्रिम वारे घेण्याची गरज भासली नाही घरे जरी साधी असली तरी राहायला जागा कमी असलीं तरी मनात एकोपा होता एकामेकांच्या सुखात दुःखात सहभागी होत होते सर्व एकामेकांच्या विचार घेत होते उंची कपडे घालायला नव्हती पण मन स्वच्छ होती कुचेष्टा कमी पणाची वागणूक नव्हती साध्या वेशातील लोक रानांत वस्ती आजुबाजुला हिरवळ उंच उंच डोंगर कपारी झुळझुळ वाहणारे झरे तुथडी भरून वाहणार्या नद्या सर्व कसे अगदी स्वच्छ असे शिक्षण घेण्यासाठी पारावरची अन्यथा गावातील देवळातील शाळा बेमाफी फि नाही पण शिक्षण मनासारखं होत मोकळी हवा रोजच्या रोज ताजे वातावरण रोज उगवणारा नितळ तेज असणारा सुर्य स्वच्छ किरणे कसलही प्रदुषण नाही केमिकल नाही कारणं त्यावेळी आपल्या आशा आकांक्षा इच्छा कमी होत्या खायला दुध तुप लोणी भरपूर भाजीपाला बिगर केमिकल्स लग्न संभारभ साधे पध्दतीने विविध कार्यक्रम साध्या पद्धतीने व कसलही ध्वनी प्रदुषण नाही जास्त धामधूम नाही कचासलाही आजार नाही दात घासायला बाभळीचे ठेरे कडुलिंबाच्या काड्या. मी पाहिले आहे की काहीजण मातीने दात स्वच्छ करत होते तरी त्यांचे दात शंभर वर्षे टिकत होतें कोणतेही कोलगेट नाही कसलीही पाउडर नाही रानात काबाडकष्ट करणारे लोक कधी यांचें गुडघे दुखले नाही त्यांना खाल्याले पचवायसाठी फिरायला जाण्याची गरजच नव्हती लोक प्रातविधी करायला सुध्दा चालत एक किलोमीटर चालत जात होते करमणुकीचे साधन रेडिओ होता गावात एकाच घरात टिव्ही असायचा.काळ बदलला आणि आपल्या अशा आकांक्षा वाढल्या खाण्यापासून सर्व सुविधा घरातच आल्या आणि येथून आपला व्यायाम थांबला वाढणारया लोकसंख्येमुळे जागा कमी पडू लागली लोक जंगल तोडायला सुरुवात झाली आणि आपलीं अधोगती चालू झाली जागोजागी सिमेंट जंगल उभी राहिली वाढत्या लोकसंख्येमुळे हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली आणि एम आय डी सी विविध केमिकल कारखाने सुरू होण्यास सुरुवात झाली त्यामुळे या प्रगतीमुळे आपल्या हाताला काम मिळाले हातात पैसा येण्यास सुरुवात झाली मग आपल्या खाण्यात पिण्यात बदल झाला खाण केमिकलच राहणं बदललं गाड्या आल्या चालन बंद झाले मुल पारावरचया शाळेतून शहरात शिक्षण घ्यायला लागली बेमाफी फि काहीजणांनी मुल मुली सांभाळण्यासाठी होस्टेलमध्ये शिक्षण घेण्यास पाठवली आणि व्यक्तिून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावायला लागला माणसाला विमानांची गती आली जीवन व्यवस्थित चाललें होते वरिल प्रमाणे सर्व काही सुरळीत चालू होते एक बाजू आपण बघितली पण एकाबाजूला मोठा खड्डा पडला तो म्हणजे विविध कारखाने केमिकल कंपनी एम आय डी सी या माध्यमातून आपणांस फायदा झाला पण हे सर्व मिळवताना आपण या सर्व औधौगिक विकास यामधून बाहेर पडणारे वेष्टज केमिकलचे पाणी बाॅयलर मधून बाहेर पडणारा धूर यामधून होणारें प्रदुषण घाण पाणी नदीत सोडले जाते त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ पाणी अस्वच्छ दुर्गंधीयुक्त त्यामुळे व निघणारा धूर यातून विविध रोग व्हायरस निर्माण होण्यास सुरुवात झाली मलेरिया. डेंग्यूचा प्रादुर्भाव विविध तापाचे आजार मधूमेह व कॅन्सर बीपी काविळनुर्वात क्षय. फुफ्फुसाचे विविध आजार दमा टिबी. मानसिक व शारीरिक दृष्ट्या अपंग मुले. असे एक नाही अनेक रोगराई आपणच आणली आहे मला काय पूर्ण माहिती नाही पण आपण जी रोज श्वासोच्छ्वास करताना विविध असे अनेक व्हायरस आपण घेत असलेल्या श्वासा वाटे आपल्या शरीरात जातात पण त्यामुळे आपणांस जीवीत हाणी होतं नाही पण यातूनच असे काही व्हायरस निर्माण झाले की त्याने मानवी जीवन अगदी हालवून ठेवले ते आपण गेल्या. २२/२३ मार्च 2020 पासून भोगतो आहे.आणि असा एक व्हायरस आज आपल्या जीवन मरणावर आला आहे जगण्यासाठी विमानांप्रमाणे धावनारा माणूस जीव वाचवण्यासाठी घरातच बसून राहिला आहे शासन या जीवघेण्या आजारांपासून जनता व सर्व सामान्य माणूस वाचावा म्हणून वेळोवेळी लाॅकडाऊन करत आहे घरातच रहा सुरक्षित रहा असा नारा शासन व शासनाचे अधिकारी व कर्मचारी डॉ नर्स सामाजिक संघटना सेवाभावी संस्था मोठा प्रयत्न करत आहेत आपणं रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता पोलिस बांधव अहोरात्र रस्त्यावर उभे आहेत पण आपणास अजून सुध्दा वेळेच गांभीर्य नाही.आज. मोठे लग्न नाही वाढदिवस मुंजी जावळ. विविध पार्ट्या विनाकारण रांत्र दिवस रस्त्यावर फिरणे चौकात घोळका करून गुटखा तंबाखू रात्र रात्र चालणारे बिअर बार डान्स बार यातून होणारी गुन्हेगारीत वाढ वाढणारे गुन्हेगार वाढणारे गुन्हे त्यातून तयार होणारे टोळीयुद्ध गॅगवार. जागोजागी तयार होणारे गुंड यामुळे महिला मुली याचं जीवन धोक्यात आले आहे आपण कोणाच्यात जात नाही कोणाला आपल्यात येवून देत नाही. पाऊना पयी त्यांनाच काय पण आपला भाऊ बहिण हे सुद्धा एकामेकांच्यात जाऊ येवू शकत नाहीत आत्ता लग्नात जास्त माणसं नाहीत मोठ्या मोठ्या पंगती नाहीत अनाठायी खर्च नाही वाढदिवस फॅशन बंद लग्न करायची एक पद्धत सांगतो काही जणांनी दोन चाकी गाडीवरून जाऊन लग्न केले माझा हा येणार आहे थांबा म्हणने बंद झाले जागोजागी मदत देण्यास सुरुवात झाली. स्थानिक लोकांनी फुलनाही फुलांची पाकळी सारखी मदत केली जागोजागी लोकांना काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही उपासमारीची वेळ आली त्यावेळी जेवने चालू झाली. मदत केली पण त्यात आम्ही दिले याचा पुरावा म्हणून प्रत्त्येक क्षणाचे फोटो काढले. एकच घटक सोडला तर तो म्हणजे पोलिस निरीक्षक पी आय डी वाय एसपी यांचेकडून सुध्दा बरीच भरीव मदत झाली पण कोठेही फोटोग्राफी नाही कसलाही गाजावाजा नाही केंद्र शासनाच्या वतीने आत्मनिर्भर योजने अंतर्गत परगावाहून असलेले मजूर. ब. गटातील म्हणजे ज्यांना धान्य मिळत नाही यांचेसाठी एक महिना मोफत तांदूळ दिला कोणाला मिळाला कोणाला नाही. अंत्योदय दिनदयाळ योजना अंतर्गत. त्यांना महिन्यांचा. २/३ किलोचा महिन्यांचा अन्न धान्य वितरण करून पर माणसी पाच किलो मोफत तांदूळ दिला पण ज्यांच्या शिधापत्रिकेवर नाव जास्त आहेत त्यांना हा रेशनचा तांदूळ जास्त झाला त्यांनी तो तांदूळ मार्केटमध्ये १०/१२/किलोने विकला. म्हणून एका बाजूला जनता उपाशी मरत होती आणि त्याचवेळी आपल्या जिल्ह्यात जागोजागी टनांपर्यंत. रेशनचा तांदूळ सापडत होता म्हणजे शासन वाईट नाही ज्यांना मदत केली ती लोक वाईट आहेत.रुग्ण संख्या एवढी झपाट्याने वाढली की आॅकसिजन कमतरता दवाखान्यात बेड नाही सर्व सामाजिक हाॅल मस्जिद. दवाखाने यांचा उपयोग रुग्णांना उपचार देण्यासाठी. दवाखान्यात कन्व्हर्ट करण्यात आले शासनाने महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना व्हायरस रोगी साठी चालू केली त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळाला पेशंटला भेटण्यास मनाई कोणी मयत झाले तरी कोण कुणाच्याही जात नाही कोण आले नाही कोण वाट बघत नाही मृत्यू तांडव भयानक होते दवाखान्या पासून पैसे उकळणयाचे काम चालू ते मयत जाळण्यापरयणत बेमाफी पैसा उकळला जात होता आपल्या प्रिय माणसाचा शेवटी चेहरा सुद्धा दाखविला जात नव्हता जागोजागी असा प्रकार पाहावयास मिळत होता की लोकांना दहन देण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे त्यांना दहन दिले जात होते मृतांचे प्रमाण वाढले अशी वेळ आली की अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेताचे कुत्री लचके तोडून खायला लागले सर्व प्रकार भयानक होता.थोडे प्रमाण व्हायरस रोगांचे कमी आले पुन्हा एकदा सर्वजण मागचा प्रकार विसरून कामाला लागले पण एक वर्ष व्हायरस रोगाच्या भितीने घरातच अडकून पडलेल्या कुटुंबांचे घरफाळा. लाईट बील. पानपट्टी. बॅंक कर्ज. पतसंस्था. भिसी. कट्टा भिसी. लोकांचे देण. रोगाच्या काळात दुकानदारांची उधारी. असे एक नाही अनेक प्रकरणे आ वासून उभी राहिली लोकांना आपण घरातच होतो त्यामुळे वरील सर्व करांची रक्कम सरकारने माफ करावी यासाठी बर्याच समाजसेवकानी जनतेला खोटी आश्वासने देऊन सदर कर न भरण्यासाठी भरिव घातले पण सर्व व्यर्थ झाले शेवटी दंड आणि दंडाला व्याज लावून आपणास जगविणारयानी रक्कमा वसूल केल्या जप्ती. लाईट बंद करण्याची धमकी दिली गेली तेव्हा एकही समाजसेवक पुढे आला नाही जनता पूर्णपणे भरडली गेली सर्वात मोठा खड्डा पडला तो म्हणजे. एम पी सी स्पर्धा परीक्षा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग. अॅकडमी. यांनी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात मनमानी फि भरुन घेतलीं तसेच. परगावी शिकण्यास जाणारी मुलं मुली. हाॅसटेल. मध्ये व्यवस्थित शिक्षण मिळत म्हणून त्यांच्या पालकांनी कमीत कमी. ४० हजार ते एक लाखापर्यंत फी भरली आणि मार्च मध्ये आणि आत्ता सर्व मुलं मुली. व्हायरस रोगाच्या भीतीने घराकडे पाठविण्यात आली पण या मुलांच्या पालकांकडून शिक्षणाच्या नावाखाली भरलेल्या मनमानी फि याच काय. ? मोठा प्रश्न आहे. ? यातून वेगळा मार्ग काढला आॅनलाइन पध्दतीने शिक्षण शाळेत शिकवून ज्या मुलांना समजतं नाही त्यांना आॅनलाइन अभ्यास करणे सोपे आहे का ? याचा अर्थ मुलांच्या पालकांकडून शिक्षणाच्या नावाखाली भरलेल्या लाखों करोडो रुपयांचे काय ? ते शिक्षण संस्था मागे देणार काय ? शिक्षण घेण्याची इच्छा असणारी मुले पण घरची परिस्थिती बेताची बिकट असल्याने त्यांना स्मार्ट फोन मिळाला नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्या केल्या कोण घेणार जबाबदारी उत्तर आहे का. ? काही मुले मुली खेडेगावात रहिवासी असलेल्याने काहींच्या कडे स्मार्ट फोन होते पण त्या मोबाईलवर टाॅवर नाही त्यामुळे काहीच शिकता आले नाही यांनी वर्षभर अभ्यास केला त्याचा उपयोग काय. ? पोलिस भरती नाही. सैनिक भरती नाही. रेल्वे भरती नाही. अशा विविध भरती प्रक्रिया व्हायरस रोगामुळे थांबल्या. मुलांची. आज परीक्षा तारीख जाहीर होईल. उद्या तारीख जाहीर होईल या दुटप्पीपणा मुळे. मानसिक कुचंबणा झाली. यातल्या काही मुलांची मानसिकता बदलली आणि त्यांनी. मिळेल ते काम करायला सुरुवात केली. शासनाला नविन अधिकार व कर्मचारी नेमायचेच नाहीत असा याचा अर्थ होतो काय. ? काही मुलांनी भरती प्रक्रिया याची वाट बघत बघत लग्नाचे वय निघून गेले यांना कोण मुली देणार का ? यांची लग्ने होणार का ? आई बाबा यांचे मन हळवं आहे आपला मुलगा कोणतरी अधिकार व्हावा अशी इच्छा आहे पण वेळ बघता चारी बाजूंनी कोंडी झाली आहे. म्हणजे. कामगारांचा मुलगा कामगारच होणार का ? इंजिनिअर याचा मुलगा इंजिनिअर होणारं का ? डॉ वकील पोलिस सैन्यात नेव्ही रेल्वे अशा ठिकाणी ज्याचा पालक आणि पैसा आहे तोच भरती होणार यात शंका नाही ? आपण फक्त जगायचे दोन वेळच्या जेवणासाठी कोणतंही काम करुन काय आणि केंव्हा होणार सर्व सुरळीत काय माहित ? पुन्हा अशी परिस्थिती आ वासून उभी राहिली आहे अशा विविध माध्यमातून आपल्या जीवनाला घुणा लागला आहे आणि अजून जर आपण नाही विचार केला तर असाच प्रकार आपल्या समोर कायम येणार.वरील प्रमाणे समाजसेवा, उठाव, बंद आंदोलन, मोर्चा, उपोषण, रस्ता रोको आंदोलन, निवेदन, तक्रार अर्ज, मागणी अर्ज, प्रचार/ प्रसार/प्रसिध्दी/वाचन/ लेखन/संबोधन/प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका/जिल्हा/राज्य व देशभर पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील दुरध्वनी नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे श्री अहमद नबीलाल मुंडे यांनी व त्यांचा अल्प परिचय म्हणजे संस्थापक/अध्यक्ष खालिलप्रमाणे:-रुग्ण, हक्क व अधिकार समिती – सांगली जिल्हा,रेशन अधिनियम कायदा २०१३, रक्षक समिती सांगली जिल्हा,मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा,माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा, दुरध्वनी – ९८९०८२५८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here