आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार भिवकुंड विसापूर परिसरात 100 बेडेड कोविड केअर सेंटर

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,चंन्द्रपुर: बल्‍लारपूर शहर व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागातील वाढती कोरोना रूग्‍णांची संख्‍या लक्षात घेता माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार बल्‍लारपूर शहरानजिकच्‍या समाज कल्‍याण विभागाच्‍या इमारतीत नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन 100 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्‍याच्‍या द़ष्‍टीने तयारी सुरू झाली आहे. या ठिकाणी या आधी 60 बेडेड कोविड केअर सेंटर सुरू होते. दिनांक २२ एप्रील रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पाहणी केली, नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, तहसिलदार संजय राईंचवार यांच्‍याशी चर्चा देखील केली. त्‍या अनुषंगाने भिवकुंड विसापूर येथील अनुसुचित जाती व नवबौध्‍द मुलांची शासकीय निवासी शाळा येथे 100 बेडेड कोविड केअर सेंटर सुरू करण्‍याच्‍या द़ष्‍टीने तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. आज नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक,  तहसिलदार संजय राईंचवार यांनी या कोविड केअर सेंटरचा आढावा घेतला. याठिकाणी रूग्‍णांना उत्‍तम सोयीसुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍या, भोजन व्‍यवस्‍था उत्‍तम असावी याकडे विशेष लक्ष दयावे असे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी निर्देशित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here