अँब्युलन्स लोकार्पण

0

मनमाड – नांदगांव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार सुहासआण्णा कांदे यांचे विशेष प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे तीस बेड चे कोविड सेंटर मंजुर करण्यात आले आहे. या कोविड सेंटर मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असुन उद्या दुपारी तीन वाजेपासुन उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज होणार आहे, तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेतर्फे मोफत अँब्युलन्स सुविधा पुरविण्यात येणार असून यावेळी अँब्युलन्सचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रूग्णांची हेळसांड होवू नये यासाठी रूग्णांना लागणाऱ्या चादर, बेडशिट, उषा यांसारख्या इतर सर्व सुविधा आमदारांतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here