जनजागृती सेवा समिती ग्रुप सदस्यांना ऑनलाईन ई “कोविड योध्दा सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत

0

मुंबई-गेल्या दीड वर्षात या कोरोना महामारीच्या काळात जनजागृती सेवा समिती च्या महाराष्ट्रातील सर्व ग्रुप सदस्यांनी आपला जीव धोक्यात घालुन सामाजिक बांधिलकी म्हणुन सामान्य जनतेसाठी कौतुकास्पद काम केलेल आहे. जनजागृतीच्या ग्रुपवर विविध क्षेत्रातील नामांकीत,प्रतिभावंत,दानशुर,व्यक्ती कार्यरत आहेत. प्रत्येकाने आपआपल्या परीने या कोरोना काळात सर्वश्रेष्ठ असे समाजकार्य केलेल आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ‘ जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडुन ई”कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे.सर्व सदस्यांना त्यांच्या पर्सनल व्हाटसपवर नंबरवर हे सन्मानपत्र पाठविण्यात आले आहे. जनजागृतीने आपल्या परीने हा छोटासा सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ऑनलाईन उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृती सेवा समितीचे खजिनदार दत्ता कडुलकर व सचिव सौ.संचिता भंडारी, महेश्वर तेटांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.धन्यवाद,महेश्वर तेटांबे,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here