
मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली आहे.त्या अंतर्गत आज रेल्वे सफाई कर्मचारी व PWI कर्मचारी यांना झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांनी या कर्मचाऱ्यांना कोरोना व कोरोना लसीकरण संदर्भात संबोधित केले. १मे व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी सफाई कर्मचारी वर्गाचे परीक्षक कपुर साहेब व PWI सुशीलकुमार साहेब उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष सम्राट गरूड,सचिन इंगळे, सागर साळवे,अनिल अहिरे, विनोद खरे, सुनिल सोनवणे,दिपक बागुल, अर्जुन बागुल, भिमराव धिवर,हरीचंद्र वाघ, भास्कर दराणे, सिद्धार्थ शिंदे, राहुल केदारे,भारत गुंड, मनिष साळवे आदीने केले.
