अनकाई शिवरात वीज पडून दोन ठार ; एक जखमी

0

मनमाड – प्रतिनिधी: मनमाड – येवला राज्यमार्गावर अनकाई शिवारात असलेल्या विसापूर फाटा येथे येणाऱ्या अवकाळी पावसामुळे आसरा घेण्यासाठी थांबलेल्या तीन जणांवर विज पडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरातील लोकांनी एकच धाव घेऊन जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.जिल्ह्यासह  प्रत्येक तालुक्यामध्ये  गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम अवकाळी पावसाची  सरी पडत होते. मात्र आज सायंकाळच्या सुमारास येवला तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पाऊस पावसापासून बचाव करण्यासाठी दोन मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी  रोड लगत असलेल्या दुकानात खाली थांबले आणि विजेच्या कडकडाटासह वीज ही त्यांच्यावर कोसळली.  मनमाड – येवला राज्यमार्गाने जात असलेल्या एम एच १५ जी के ७९८६ व एम ४१ ए व्ही १०७८ या दोन मोटारसायकल वरून प्रवास करीत होते. या घटनेमध्ये एका गाडीवरील विद्या सरदारसिंग संधू ही महिला वाचली असून तिला पुढील उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर हरपालसिंग बच्चनसिंग शिख(मयत) वय 30 रा.कोपरगाव आणि रमेश संजय गाढे(मयत) वय 45 वर्षे रा.गिरणारे ता.देवळा अशी दोन नावे मयत झाल्याची चर्चा होत आहे. तसेच गुजरखेडे ता.येवला येथील सीताराम तुकाराम गायकवाड यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here