कोरोना रुग्णांना रुग्णालय कॅशलेस उपचार मिळत नसेल तर येथे तक्रार दाखल करा, आता त्वरित कारवाई केली जाणार !

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप,९७६८४२५७५७,विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ने विमा कंपन्यांना कोरोना रुग्णाला कॅशलेस उपचार सुविधा देण्यास सांगितले आहे.अनेक रुग्णालये त्यांच्या पॉलिसीअंतर्गत कॅशलेस उपचार मिळविण्याचा हक्क असलेल्या पॉलिसीधारकांना कोविड -19 च्या उपचारासाठी कॅशलेसची सुविधा देत नाहीत.जर आपला मित्र किंवा नातेवाईकांसमवेतही अशीच घटना घडली असेल तर आपण सहजपणे विमा कंपनी आणि विमा लोकपाल अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता.येथेनोंदवा तक्रार :http://www.policyholder.gov.in/Report.aspx#) या फॉर्ममधील तक्रारीचा तपशील भरून, तक्रार इरडाच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येतील.ग्राहक निवारण संपर्क : इरडाच्या ग्राहक निवारण विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर 155255 किंवा 1800 4254 732 वर कॉल करून आपण तक्रार नोंदवू शकता.आपल्याकडे रेफरेंस नंबर ठेवला पाहिजे :* इरडा किंवा विमा कंपनीकडे तक्रार दाखल केल्यानंतर लेखी पोचपावती किंवा रेफरेंस नंबर घेणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आपल्या तक्रारीवर काय कारवाई केली गेली आहे हे शोधण्यास सक्षमअसाल.रुग्णालयावर कारवाई होणार :* जर तक्रार नोंदविण्याच्या 15 दिवसांच्या आत विमा कंपनीने समाधानकारक पाऊल उचलले नाही तर विमाधारक विमा नियामक इरडाकडे तक्रार दाखल करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here