
मुंबई- अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक
चित्रपटमहर्षी कै.दादासाहेब फाळके यांची दिनांक ३० एप्रिल सकाळी ९ वाजता हिंदमाता, दादर येथे उत्साही वातावरणात जयंती साजरी करण्यांत आली. जयंती उत्सवाला अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. देवेंद्र मोरे,
दादासाहेब फाळके यांचे नातू श्री.चंद्रकांत पुसाळकर आणि श्रीमती पुसाळकर, महासचिव श्री. राजेंद्र बोडारे, प्रसिद्दी प्रमुख, पत्रकार महेश्वर तेटांबे, महासचिव सतशील मेश्राम, सचिव राजु शेवाळे, सचिव मनिष व्हटकर इ.मान्यवर उपस्थित होते. जयंतीचे औचित्य साधुन देवेंद्र मोरे कृत पँथर या आगामी चित्रपटाची घोषणा केली.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,पत्रकार
९०८२२९३८६७
