कोरोना काळात दुर्लक्षित घटकांना मदतीचे कार्य मोलाचे – तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – महापौर मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे आणि आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथी भगिनींना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने दिलेली मदत मोलाची आहे असे गौरावोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ याच काळात नव्हे तर कायमच तृतीयपंथीच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करू असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन ने कोविड योद्धाच्या आरोग्याची काळजी वाहण्याचे ठरवलं व समाजातील दुर्लक्षित घटकांना आवश्यक मदत करण्याचा निर्धार केल्यानंतर समाजातील विविध क्षेत्रातून मदतीचा हात पुढे येत आहे व आज मुकुल माधव फाउंडेशन च्या सहकार्याने तृतीयपंथी भगिनींना मदत करत आहोत असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. तृतीपंथीच्या लसीकरणासाठी आपण प्रयत्नशील असून ज्यांच्याकडे आधार कार्ड वा अन्य पुरावा आहे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यास डॉ वैशाली जाधव यांनी सहमती दर्शविली आहे मात्र ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही अश्यांच्या लसीकरणाबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी ही संदीप खर्डेकर यांनी केली. यावेळी क्रियेटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विशाल भेलके, मुकुल माधव फाउंडेशन च्या यास्मिन शेख, योगेश रोकडे इ मान्यवर उपस्थित होते.मुकुल माधव फाउंडेशन ने सेवाकार्याचे व्रत घेतले असून सर्व क्षेत्रात आम्ही मदतकार्य करत असल्याचे समन्व्यक यास्मिन शेख म्हणाल्या. व्हेंटिलेटर, oxygen concentrator, शिधा यासह विविध मदतकार्य सुरु असल्याचे ही त्या म्हणाल्या.खरे तर आम्ही अनेक शतकं आयसोलेशन मधेच आहोत, दुर्लक्षित आहोत, सामाजिक दृष्ट्या उपेक्षित आहोत आणि एक प्रकारे विलगीकरणाची आम्हाला सवय आहे असे मन हेलावणारे विधान तृतीय पंथी भगिनींसाठी कार्य करणाऱ्या मिस्ट संस्थेच्या अध्यक्ष सोनाली दळवी यांनी काढले. आज केलेल्या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त करतानाच आमचे लसीकरण सुकर व्हावे, शासनाने घोषित केलेली मदत आम्हाला मिळावी आणि माणूस म्हणून जगता यावे, समाजाने आम्हाला स्वीकारावे असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले. तसेच महिला व बालकल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयासाठीचा निधी सर्व भगिनींच्या खात्यात जमा व्हावा अशी आग्रही मागणी देखील त्यांनी मांडली.क्रिएटिव्ह फाउंडेशन सेवाकार्य अविरत सुरु ठेवणार असून जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका असल्याचे फाउंडेशन च्या विश्वस्त शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी तृतीयपंथीयांच्या विविध मागण्यांचे निवेदन ही मा. महापौरांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here