
मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. असे राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे.● नवीन नियमावलीतील नियम कोणते ?1) 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2)15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3) सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4) सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5) राज्यात जिल्हा बंदी लागू
6) अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7) सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8) खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9) सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार
10) एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार
11) अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12) खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड13) सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
14) अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार
15) लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी16) लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार 17) बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार 18) होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक19) कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार 20) फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार ● या नियमांचे पालन झाले नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.● त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
