आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटी चा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये हे कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकारणे खरेदी करण्यासाठी खर्च करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी याचा लाभ होईल. या निधीसह उर्वरित 3 कोटी चा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. नेहमीच्या विकासकामांना फाटा देऊन यावेळेसचा निधी हा पूर्णपणे आरोग्यावर खर्च करणार असल्याचेही चंद्रकांतदादा म्हणाले.चंद्रकांतदादा यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सर्व आमदारांना कोवीड साठी दिलेल्या निधीतून बाणेर येथील रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर, 10 मॉनिटर व अनुषंगिक साहित्य,2 एक्स रे मशीन प्रिंटर व व्युहर सह ( रेडिओग्राफी तंत्रज्ञान ) इ.सी जी मशीन, पी ए व सिसिटीव्ही व अन्य रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. ( सोबत यादी जोडली आहे )
मा. जिल्हाधिकारी यांनी खरेदी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी अशी अपेक्षा ही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here