युनिव्हर्सल हुमन राइट कौन्सिल भारत मुंबई टीम व अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा. मास्क व पाणी वाटप..

0

मुंबई –  दिनांक २६/०४/२०२१ रोजी युनिव्हर्सल हुमन राइट कौन्सिल भारत मुंबई टीम व अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पोलीस कमिशनर श्री हेमंत नगराळे सर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई मधील उन्हातान्हात उभे राहून नाकाबंदी साठी व लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांसाठी त्यांच्या कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना मोफत पाणी व मास्क वाटप करण्यात आले.सादर कार्यक्रमास सुरुवात सकाळी ११.३० पासून दादर टी. टी सर्कल येथून करण्यात आली. १)चित्रा टॉकीज येथे नाकाबंदी वर असलेल्या पोलीस अधिकारी व शिपाई यांना पाणी वाटप करण्यात आले,२)लालबाग गणेश गल्ली येथे पाणी वाटप करण्यात आले,३)तेजुकाया मेंशन,४) हिरामणी मार्केट पोलीस बीट, ५)काळाचौकी पोलीस ठाणे, ६)नागपाडा वाहतूक पोलीस चौकी,भायखळा* या सर्व ठिकाणा वरील जवळ जवळ १५० ते २०० पोलीस अधिकारी व शिपाई यांना मोफत पाणी,मास्क वाटप करण्यात आले. पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोकुळ सिंग पाटील साहेब ( काळाचौकी पोलीस ठाणे)* यांनी युनिव्हर्सल ह्यूमन राईट कौन्सिल व अक्षरा सामाजिक संस्थेचे आभार मानले.सदर कार्यक्रमास महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू दादा सकपाळ,मुंबई महासचिव व अक्षरा संस्थेचे अध्यक्ष श्री.अमोल वंजारे, चिंचपोकळी ब्लॉक प्रेसिडेंट सौ.वसुधा वाळूंज, दादर ब्लॉक प्रेसिडेंट श्री सचिन जाईजोडे, संजीव परमार,अंजली भोसले* व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.धन्यवाद,महेश्वर तेटांबे,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here