कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न

0

मुंबई -प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग परेल आयोजीत भव्य असे रक्तदान शिबीर रविवार दिनांक २५ एप्रिल रोजी कात्रादेवी वसाहती मधिल प्रांगणात संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या यां शिबीरात जवळजवळ १२५ ते १५० रक्तदात्यानी सहभाग घेऊन आपले दातृत्व सिद्ध केले आहे.
सध्या कोरोना सारख्या महामारीने अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारत देशांत थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत स्वतःची सुरक्षा आणि सोशल डिस्टन्स चे भान राखून कात्रादेवी आदर्श वसाहत गणेशोत्सव मंडळाने आपला पुन्हा एकदा आदर्श सिद्ध करून हा रक्तदान शिबीर सोहळा यशस्वीरित्या संपन्न केला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश तेरवणकर, सचिव सतिश कविटकर, खजिनदार अमोल डफळे, कार्याध्यक्ष हरिशंकर बारी, मनसे शाखाप्रमुख सपान पाठारे, पत्रकार महेश्वर तेटांबे, स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ, मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नेहमीच आपल्या सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांत अग्रेसर असते. १ में पासून वय वर्ष १८ पुढील प्रत्येक व्यक्तीस लसीकरण हे बंधनकारक असून भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यां उद्देशाने कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा रक्तदान सोहळा आयोजीत केला असून विभागातील सर्व तरुण वर्गाने यां शिबिरास चांगला प्रतिसाद दिला असे प्रतिपादन करून अध्यक्ष तेरवणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.धन्यवाद,महेश्वर तेटांबे,पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here