चंद्रकांत इंगळे यांचे `ये खाकी है’गीत युटुबवर होतय प्रचंड व्हायरल.

0

नाशिक – अनेकांच पोलिस व्हायच स्वप्न असत.त्यासाठी कित्येक तरुण आज गावोगाव ,खेडोपाडी खुप मेहनत घेत आहेत पोलिस होण्यासाठी.त्यांच्या स्वप्नाच्या पंखाना बळ देणारे प्रेरणादायी हिंदी गीत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.या गीताचे गायन लेखन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक,गीतकार चंद्रकांत इंगळे यांनी केले असून संगीत उदय सुर्यवंशी तसेच व्हिडीओ किरण पानपाटील,मुखपृष्ठ एस एम ग्राफीक्स यांनी केले आहे.या गीतात पोलिसांची कामगिरी,त्यांची भारतीय माणसाच्या जीवनातील उपयोगीतता,त्यांचे धाडस त्यांच्या कार्याचा गौरव केला असून तरुणांना हे गीत अधिक पसंतीस पडत आहे.चंद्रकांत इंगळे यांनी यापुर्वी पाण्याचा जपून वापर कर,तु दिसताच,भिमराया,यासह अनेक गीतांच्या माध्यमातून युटुब वरुन जनतेचे प्रबोधन केले आहे.आपल्या गीतातून केवळ मनोरंजन न होता सामाजिक संदेश,सामाजिक समस्या,जनजागृती करण्याचा मानस असून `ये खाकी है’या गीताला अधिकाधिक लोकांपर्यत पोहचवून पोलिस बांधवांच्या कार्याला सलाम करुया असे आवाहन या गीताचे गायक,गीतकार चंद्रकांत इंगळे यांनी केले आहे.chandrakant ingale production या चॕनल वरुन तुम्ही हे गीत बघू शकता.असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतानां कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here