जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) येवला येथे लोकनेते स्व. व्यंकटरावजी हिरे यांची ९२वी जयंती साजरी.

0

येवला –  दि. २४ एप्रिल २०२१ रोजी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) येवला येथे लोकनेते स्व. व्यंकटरावजी हिरे यांची ९२वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सुरवातीला प्रतिमा पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री. दादासाहेब मामुडे व पर्यवेक्षक श्री. मच्छिंद्र सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री. दादासाहेब मामुडे यांनी लोकनेते स्व. व्यंकटरावजी हिरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनींनी सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. अशोक वरपे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here