ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे कोरोना व कोरोणा लसीकरण संदर्भात जनजागृती मोहिम झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे.

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे कोरोना व कोरोणा लसीकरण संदर्भात जनजागृती मोहिम झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे.सर्व प्रथम सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची झुम मिटींग घेण्यात आली.या मध्ये झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, उपाध्यक्ष सागर गरूड यांनी कोरोना व कोरोणा लसीकरण संदर्भात माहिती दिली.यासंदर्भात व्यापक अशी मोहीम ठरविण्यात आली.त्यानुसार मनमाड वर्कशॉप मधील सर्व कामगारांना कोरोना लसीकरण संदर्भात माहिती त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सांगण्यात आली.प्रत्येक शॉप मध्ये झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, सचिन इंगळे तसेच शॉपमधील असोसिएशन चे कार्यकर्ते व शॉप मधील रेल्वे चे अधिकारी यांनी कामगारांना कोरोना लसीकरण चे महत्व सांगुन प्रत्येक कामगारांने व कामगारांच्या घरांतील ४५वयपुर्ण झालेल्या व्यक्तीने लस घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यापुढे असोसिएशन तर्फे प्रत्येक रेल्वे कॉलनी मध्ये जाऊन लसीकरण संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.मे महिन्यात प्रत्येक रेल्वे कर्मचारी च्या घरी जाऊन व संपूर्ण मनमाड शहरात ही जनजागृती मोहिम सुरू करणार आहे.या मोहीम राबवताना कोरोणा संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.अशी माहिती झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here