नांदगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मनमाड येथे ऑक्सिजन बेड सह सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात आले

0

मनमाड – नांदगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मनमाड येथे ऑक्सिजन बेड सह सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात आले असून या कोविड सेंटर चे उद्घाटन आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील तसेच परिसरातील रुग्णांना या कोविड सेंटरचा लाभ होणार आहे. या कोविड सेंटरमुळे रुग्णांना नाशिक किंवा इतरत्र धावा धाव करावी लागणार नसल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणार आहे. यावेळी तहसीलदार कुलकर्णी, डॉ निर्भवने, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, मनमाड, नांदगांव पोलीस निरीक्षक, मनमाड व नांदगांव नगरपरिषद मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद सर्व नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, राजाभाऊ आहिरे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here