सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात घेण्यात आला रूट चार्ज

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागातील डोंगरगाव बोरगाव बाजार येथे सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या वतीने कडक निर्बंध व रमजान महिन्याच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सगळीकडे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे सर्वानी तंतोतंत पालन करावे, कुणीही विनाकारण रस्त्याने विनामास्क फिरू नये,अतिआवश्यक काम असल्यास तरच घराबाहेर पडावे. व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिवीक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here