वासोळ येथील जि. प. मराठी प्राथमिक शाळेत लसीकरणाला सुरवात

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. ९१३००४००२४: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे . या लसीकरण केंद्राचे उद्घाटन वासोळ चे तंटामुक्ती चे अध्यक्ष चंद्रकात पाटील,पो.पाटील कैलास खैरनार आणि वासोळ आरोग्य उपकेंद्र आरोग्य सेवक डॉ.महेश सुर्यवंशी ,समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश सर व आरोग्य सेविका वंदना बच्छाव, आशा सेविका अलका केदारे, माया गांगुडे यांच्याहस्ते आज सोमवार दि. १९ एप्रिल रोजी करण्यात आले.वासोळ येथे लसीकरण केंद्र नसल्याने मेंशी व लोहणेर येथील आरोग्य केंद्रात लसीकरणाला जाण्यासाठी जेष्ठ नागरिकांना (४५ वर्षा पुढील)मोठी समस्या निर्माण झाली होती त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह(४५ वर्षे पुढील) वासोळ चे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वासोळ येथे लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुण वासोळ येथे कोविशील्ड लस उपलब्ध केली.सध्या परिसरात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे आता या लसीने थोडे समाधान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वासोळ व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी(४५वर्ष पुढील) लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी वासोळ आरोग्य सेवक डॉ. महेश सुर्यवंशी यांनी केले आहे. वासोळ येथील लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिक ममलाबाई यांनी प्रथम लसीचा लाभ घेतला आहे. लसीकरण केंद्रात सध्या 150 कोवीशिल्ड लस उपलब्ध असल्याची माहिती यावेळी डॉ.महेश सुर्यवंशी यांनी दिली. यावेळी वासोळ सरपंच यांचे पती दिलीप खुरसाने ,कैलास खैरनार,पत्रकार प्रशांत गिरासे वैभव केदारे, व आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी , डॉ.राकेश सर आरोग्य सेविका वंदना बच्छाव, व आशा सेविका आदि ग्रामस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here