गौताळा औट्रमघाट अभयारण्यात गारगोठी खडक चोरणारे तिघे वनविभागाच्या ताब्यात

0

सिल्लोड प्रतिनिधी :  विनोद हिंगमिरे: गौताळा औट्रमघाट अभयारण्य वनपरीक्षेत्र चाळीसगाव मधील नियतक्षेत्र पाटणा कक्ष क्र.303 मध्ये गारगोठी मौल्यवान खडक उत्खनन करणारे आरोपींना दि 17 एप्रिल रोजी वनविभागाच्या पथकाने धाड टाकुन तीन आरोपीना 77 हजाराच्या मुद्देमालासह अटक केली असून त्यांना 18 रोजी न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे, वन्यजीव विभागाचे विजय सातपुते विभागीय वन अधिकारी वन्यजीव औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली एस.पी.काळे सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव कन्नड़, एम.डी.चव्हाण वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव चाळीसगाव,  डि.एस.जाधव वनपाल पाटणा,  अजय महिरे वनरक्षक बोढरा, उपालवाड वनरक्षक, एन.एस.देसले वनरक्षक पाटणा,  राजाराम चव्हाण,गोरख चव्हाण,नाना पवार,शुभम राठोड,लालचंद चव्हाण यांनी सापळा रचून कक्ष क्र.303 मध्ये गारगोठी मौल्यवान खडक उत्खनन करणारे सुकदेव गुलाब पवार (48), भगवान बबन शेलार (49) दोघे रा पाटणा ता चाळीसगाव, शेख राजीक शेख नाजीर (48) रा शिवना ता सिल्लोड जि औरंगाबाद यांना 11 किलो मौल्यवान खडकासह 77 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केली होती आरोपींना दि 18 रोजी  न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची वन कोठडी दिली आहे  पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव एम डी चव्हाण करीत चाळीसगाव  आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here