बदलापुर (महेश्वर तेटांबे)-ऑक्सीजन अभावी करोना पेशंटचे हाल होत आहेत, व्यवस्थित पुरवठा होत नाही.हे लक्षात येताच बदलापुर नगपालिकेला पुरवठा करणारे ठेकेदार कार्यसम्राट शाखाप्रमुख भलत नवगिरे यांनी ऑक्सीजन मिळविण्याच्या दृष्टिकोनातून हैद्राबादाच्या कंपनीकडून मदत घेऊन अंबरनाथ एमआयडीसी मध्ये ऑक्सीजन प्लॅन्ट उभा केला.या माध्यमातून दोन लाख लिटर ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध होणार आहे. भरत नवगिरे यांनी उभ्या केलेल्या या ऑक्सीजन प्लॅन्टच बदलापुरात सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच अनुषंगाने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भरत नवगिरे यांचा सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या वतीने अध्यक्ष सुनिल दळवी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे, सह खजिनदार मंगेश सावंत, पदाधिकारी चंद्रकांत चिले,दीपक वायंगणकर,महेश सावंत,जेष्ठ सल्लागार दीलीप नारकर, हिंदु महासभेच्या सौ.सुवर्णा इस्वलकर आशिश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोना महामारीच्या या काळात ऑक्सीजन प्लॅन्ट उभारून बदलापुरकरांना ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल भरत नवगिरे यांच सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .
Home Breaking News सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या वतीने कार्यसम्राट शाखा प्रमुख भरत नवगिरे यांचा सत्कार