वासोळला उद्या कोविड लसीकरण;४५ वर्षावरील नागरिकांनी लस टोचून घ्यावी आरोग्य सेवक डॉ. महेश सूर्यवंशी यांचे आव्हान

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. 9130040024
वासोळ ता.देवळा येथे उद्या सोमवार दि.१९ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीकरण शिबिर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.लस पूर्णपणे सुरक्षित असून वासोळ व वासोळपाडे गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस टोचून घ्यावी व लसीकरणाला येताना नागरिकांनी आपले आधार कार्ड,कोविन ॲप वर नोंदणी केलेला मोबाईल नंबर आदी.सोबत घेऊन यावे आणि लसीकरणाला येताना जेवण करून यावे असे आव्हान प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ.महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here