डाॅ.आंबेडकर जयंती व ईदनिमित्त वांगी बुद्रुक येथे शातंतता कमिटीची बैठक संपन्न

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे दि.१२ एप्रिल सोमवार रोजी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने दोन्ही उत्सव शांततेत व साध्या पद्धतीने गर्दी न करता मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.दि.१४ एप्रिल बुधवार रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डि जे,बॅड,मिरवणुक,रॅली,सार्वजनिक सभेचे आयोजन,आदी कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली असुन याअगोदरच जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने नियम मोडल्यास आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमाचे सर्व समाजातील नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी सरपंच सौ.ज्योती बापूराव काकडे व उपसरपंच सौ.ज्योती लक्ष्मण साळवे यांच्या हस्ते सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.भराडी बीट जमादार श्री. देविदास जाधव व पोलीस नाईक श्री. संदीप कोथलकर यांचा सत्कार श्री. बाळु साळवे व श्री.बापुराव काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रा.पं.सदस्या पर्यागबाई काकडे ,पोलीस पाटील श्री. चंद्रकांत जाधव, नानासाहेब गायकवाड, गंजीधर काकडे,विलास दांडगे,संतोष तायडे, लक्ष्मण तायडे,उत्तम तायडे,केशवराव हिवाळे, ग्रा.पं.कर्मचारी युनुस पठाण,ग्रा.पं.संगणक परिचालक सागर साळवे व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here