बोरगांव सारवाणीत गावअंर्तगत चालु असलेल्या नवीन सिमेंट रस्त्याच्या वादावरुन ग्रामपंचायत सदस्याच्या पती व भावाच्या गटा मध्ये तुफान हाणामारी

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: बोरगांव सारवाणीत गावअंर्तगत चालु असलेल्या नवीन सिमेंट रस्त्याच्या वादावरुन ग्रामपंचायत सदस्याच्या पती व भावाच्या गटा मध्ये तुफान हाणामारी, सिल्लोड पोलीस स्टेशनला परस्पराविरुध्द गुन्हे दाखल, बोरगाव सारवाणी ता.सिल्लोड येथे  25/15 या योजनेअतंर्गत भुमिगत गटाराचे नविन सिमेंट पाईप टाकण्याचे काम चालु होते,याच दरम्यान सिमेंट पाईप टाकण्यासाठी बोरगांव ते खातखेडा हा प्रधानमंत्री ग्राम सडक गावअतंर्गत येत असलेला सिमेन्ट रस्ता संबधीत ठेकेदाराने एकाही गावकऱ्याला विश्वासात नघेता व  गरज नसताना पुर्ण चांगला असलेला सिमेंट रस्ता जेसीबीने मनमानी पध्दतीने फोडुन टाकला होता,सदरील रस्त्याचे काम पं.स.सदस्य सत्तार बागवान हे करत आहे,तर हा खोदलेला रस्ता नव्याने करुन देत असताना तो अत्यंत निकृष्ठ पध्दतीने या रस्त्याचे काम चालु आहे असे ग्राम पंचायत सदस्य इसरार खाँ याचे म्हणने होते व ते या संदर्भात संबधीत वरिष्ठाना वेळोवेळी बोलले असताना सुध्दा त्याच्या या तक्रारीकडे संबधीतानी दुर्लक्ष केले गेले,त्यामुळे व हे चालु असलेले कामावर त्यानी दिनाक 10 रोजी आक्षेप घेत काम बंद पाडले होते,काम बंद असल्यामुळे पं.स.सदस्य सत्तार बागवान दिनांक 11 रोजी सकाळी 9 वाजता बोरगांव सारवाणी ग्राम पंचायत येथे सर्व ग्रा.प. सदस्याची मिटींग बोलवुन चालु आसलेल्या काम संबधीत तक्रारी जाणुन घेत असता ग्राम पंचायत सदस्यपती शेख शफीक यांच्या व ग्राम पंचायत सदस्याचा भाऊ इसरार खाँ यांच्या या रस्त्याच्या बोगस कामाविषयी प्रथम शाब्दीक चकमक झाली नतंर त्याचे रुपातंर हाणामारीत झाले व दोन्ही गटाचे प्रत्येकी 15 ते 20 जण समोरासमोर येऊन पं.स.सदस्य सत्तार बागवान यांच्या समोरच तुफान हाणामारी झाली व नतंर सिल्लोड ग्रामिण पोलीस स्टेशन येथे परस्पर गुन्हा नोदण्यासाठी आलेल्या दोन्ही गटात पोलीस स्टेशन आवारात शाब्दीक चकमक होऊव सिल्लोड येथे सुध्दी तुफान हाणामारी झाली,यानंतर पोलीस कर्मचारी शेख मुस्ताक यांच्या फिर्यादीवरुन कोविड 19  सदर्भाचे जमावबंदी आदेशाचे उल्लघन करुन जमावजमविल्या प्रकरणी व पोलीस स्टेशन परिसरात आपआपसात हाणामारी करुन जिल्हाधिकाऱ्याचे यांचे जमावबंदी कायद्याचे उल्लघन केल्या प्रकरणी दोन्ही गटाच्या प्रत्येकी 10 ते 15 जणावर कलम 143,147,148,149,188, 336,269,270 भा.द.वी.सहकलम 135 मपोका व आपत्तीव्यवस्थापन अधिनियम कलम 59(ब)नुसार गुन्ह्या नोद करण्यात आला,याप्रकरणात सहाय्यक पोलीस निरिक्षक पुजा गायकवाड व विकास आडे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कर्मचारी शेख मुस्ताक,व वाघ हे करीत आहे,व या सिमेंट रस्ता कामाची ग्रा.प.सदस्य इसरार खाँ यांच्या तक्रारीची  ठेकेदार व संबधीत अंभियता यांनी वेळीच दखल घेतली असती तर गावामध्ये एवढे मोठे भांडण झालेच नसते असे गावकऱ्यांतुन एेकायला मिळत आहे,तरी संबधीत विभागाच्या वरीष्ठ आधिकाऱ्यांनी यारस्त्याची पाहणी करुन दोषीवर आढळणारावर दंडात्मक कार्यवाही व या या रस्त्याचे काम चांगले दर्जेदार करण्यास मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here