वासोळात गुटखा व तंबाखू चढ्या भावाने विक्री… तंबाखू गुटखा जोमात….खाणारे मात्र कोमात

0

वासोळ : देवळा तालुक्यातील वासोळ येथे किराणा दुकानांतून सर्रासपणे अवैध गुटखा व तंबाखू विक्री जोमात सुरू आहे.गुटखा व तंबाखू चढ्या भावाने विक्री केले जात असल्याने खाणाऱ्यांचे मात्र चांगलेच वांदे झाले आहेत.थेट किराणा मालाच्या दुकानातून तंबाखू व गुटखा विक्री केली जात असल्याने प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे दरम्यान कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.मात्र या नियमांमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किराणा दुकाने चालू राहण्याचे आदेश आहेत. एवढ्या कडेकोट नियमांमध्ये किराणा व्यावसायिकांना व दुकानदारांना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध तरी कुठून होतात असा सवाल सुज्ञ नागरिक खडा करीत आहेत.गुटखा आणि तंबाखूच नाही तर सिगारेटनेही आता पेटता दर घेतला आहे.१)तंबाखू १० रू प्रती पुडी आता मात्र १५ रू प्रती पुडी २)गुटखा १० रू प्रती पुडी आता मात्र १५ रू प्रती पुडी ३)तपकीर २० रुपये प्रति पुडी आता मात्र ३० रुपये प्रति पुडी अश्या तऱ्हेने दुप्पटीचे दर चालू आहेत यामुळे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच फगले आहे.अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्यांवर कडक कार्यवाहीची मागणी नागरिक करीत आहेत.
भाऊ गायछाप माहगी व्हई गई भो…!
आते एवढाच ईडा शे;दिवसभर तिकडंन पडई… !!
तंबाखू प्रेमिंच्या अशा प्रतिक्रया सर्वत्र उमटत आहेत.
गायछापला चुना लावण्यापेक्षा गायछापच आता खाणाऱ्यांच्या खिशाला चुना लावतांना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here