येवला : येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृह येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका संघटक राम कोळगे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून संतोष गायकवाड व तुळशीराम जगताप यांच्या हस्ते मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले,महात्मा फुले हे थोर समाजसुधारक व विचारवंत होते त्यांनी सत्यशोधक समाज संस्था स्थापन करून पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी व महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची मुहूर्त रचली म्हणून महात्मा फुले यांना शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते स्त्रियांना चूल आणि मूल यापुरते बंदिस्त न ठेवता आजची स्त्री शिक्षण घेऊन मोठ्या क्षेत्रात कार्यरत असून विविध पदावर कार्यभार सांभाळत असल्याचे त्यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी आपल्या अभिवादनातून व्यक्त केले यावेळी राम कोळगे, तुळशीराम जगताप ,संतोष गायकवाड, शशिकांत जगताप ,वालुबाई जगताप, आकाश घोडेराव आधी पदाधिकारी उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले