अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: विनापरवाना अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले असून ही कारवाई चिंचवन सिल्लोड परिसरातील शिवनेरी हॉटेल येथे शुक्रवारी दुपारी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी 42 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांनी चिंचवण रस्त्यावरील हॉटेल शिवनेरी येथे दारूची विक्री सुरू असल्याची माहिती दिली पथक शिवनेरी हॉटेल येथे गेले असता दोन जण पळून जाण्याच्या तयारीत होते दरम्यान पोलिसांनी सुखदेव अक्कलकर वय 19 रा. शिंदेफळ ता. सिल्लोड ताब्यात घेतले तर राहुल सपकाळ राहणार आमठाणा तालुका सिल्लोड हा पळून जाण्यात यशस्वी झाला. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विकास आडे, कर्मचारी नितीन गायकवाड, प्रल्हाद जटाळे, मंगेश राठोड, काकासाहेब सोनवणे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here